नागपुरात कोरोना विस्फोट.. आज 133 पाॅझिटिव्ह
ओमायक्रोनच्या चार रुग्णांची भर
नागपूर-राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना उपराजधानीतही चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासून काेरोना बाधितांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. आज एकीकडे 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले असतानाच आज नागपुरात 133 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने प्रशासन काळजीत पडले आहे.यामध्ये ओमायक्रोनचे 4 रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता अजूनच वाढली आहे
रविवार 2 जानेवारी 2022 रोजी 90 काेरोना बाधितांची नोंद नागुपरात झाली होती. सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या आज तीन आकडी आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. 23 डिसेंबर 2021 पर्यत एक आकडी असलेली कोरोना बाधिताची संख्या 24 डिसेंबर 2021 पासून सातत्याने वाढत आहे. आज आढळलेल्या 133 कोरोना रुग्णांमध्ये शहरातील 105,ग्रामीणमधील 20 आणि जिल्ह्याबाहेरील 8 कोरोनाबाधित आहे.
ओमायक्रोनचे 4 रुग्ण आहेत.या चारही रुग्णांची परदेश प्रवासाची पार्श्वभूमी आहे.त्यामुळं आतापर्यंत ओमायक्रानच्या रुग्णांच्या संख्या 10 झाली आहे. निर्बंध घातल्या नंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन आता कडक पाऊले उचलण्याची शक्यता ल आहे.
नागपुरात असे वाढत गेले कोरोनाबाधित
दिनांक कोरोनाबाधित
3 जानेवारी 2022- 133
2 जानेवारी 2022- 90
1 जानेवारी 2022- 54
31 डिसेंबर 2021 - 90
30 डिसेंबर 2021 - 28
29 डिसेंबर 2021 - 27
28 डिसेंबर 2021 - 44
27 डिसेंबर 2021 - 12
26 डिसेंबर 2021 - 32
25 डिसेंबर 2021 - 24
24 डिसेंबर 2021 - 12
23 डिसेंबर 2021 - 7
22 डिसेंबर 2021 - 5