नागपूर : नागपुरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुराबर्डी परिसरामध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 निकिता चौधरी असं मयत तरुणीचे नाव आहे.  या तरुणीची हत्या करून मग  तिचा मृतदेह जाळण्यात आला की तिला जिवंत जाळण्यात आले याबाबत पोलीस तपास करत आहे.



 
 नागपूरात पुन्हा जळीत कांड


 


वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुराबर्डी परिसरात धक्कादायक घटनेने प्रशासनाची झोप उडवली आहे. एक तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून तरूणीचे नाव निकिता असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. 
  
दरम्यान, निकिता बेपत्ता असल्याची तक्रार अगोदरच  पोलिसात देण्यात आली होती. सुराबर्डी येथील एका मैदानात काल संध्याकाळी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.