Trending Video: ओव्हरटेक केल्याने चालकाची महिलेला मारहाण; Supriya Sule यांची जहरी टीका, म्हणाल्या...
Driver Beat Up Woman: नागपूरच्या घटनेवरून राज्यात महिला सुरक्षित आहे का ? कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला आहे.
Nagpur Crime News: महिला ड्राईव्हरने ओव्हरटेक (Dispute over overtaking) केलं म्हणून रागाने लालबुंद झालेल्या एका व्यक्तीने (Driver beat up the Woman) महिलेला मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना नागपूरच्या एका चौकात घडली आहे. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओची राजकीय वर्तुळात देखील चर्चा होताना दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी यावर ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ नागपूर (Nagpur Crime News) येथील जरीपटका परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. टॅक्सी चालक आणि महिलेमध्ये जोरदार राडा झाला. प्रथम शाब्दिक भांडणं सुरू झाली. त्यानंतर टॅक्सी चालकाचा पारा चढला आणि त्याने महिलेला मारहाण केली.
पाहा VIDEO -
शिवशंकर श्रीवास्तव (Shivshankar Srivastava) असं आरोपी असलेल्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. या घटनेनंतर महिलेने टॅक्सी चालकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची माहिती घेतली आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नेमकं काय घडलं?
आरोपी टॅक्सी चालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे (Indore Bhim Chowk) जात होता. त्यावेळी महिलेने टॅक्सीला ओव्हरटेक केलं. त्यावेळी सिग्नल न दिल्याचा राग आरोपीला आला आणि त्याने शिवीगाळ केली, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. शिवी दिल्याचा राग महिलेला आला आणि तिने गाडी थांबवली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला. त्यानंतर आरोपीने महिलेवर हात उचलण्याची घोडचूक केली. त्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसते.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
दरम्यान, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित (Women Safety) आहे का ?, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.