अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरमध्ये (Nagpur Crime) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी नागपूरमध्ये भररस्त्यात गुन्हेगारीच्या घटना घडत होत्या. मात्र आता नागपुरच्या कारागृहामध्येही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील (Nagpur Central Jail) बंदीवानाशी अनैसर्गिक कृत्य झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खुद्द पीडित व्यक्तीने याबाबत न्यायालयापुढे माहिती दिली आहे. बंदीवानाने न्यायालयासमोरच (Court) ही माहिती दिल्याने कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. न्यायालयाने पोलिसांना (Nagpur Police) याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित कैदी 2016 च्या विनयभंग प्रकरणातील आरोपी आहे. याप्रकरणी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याबाबत सुनावणी सुरू असताना पीडित कैद्याने न्यायालयासमोरच ही धक्कादायक माहिती दिली .कारागृहातील रुग्णालयात उपचारासाठी गेलो असता रुग्णालयात काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला असा आरोप कैद्याने केला आहे. न्यायाधिशांसमोरच कैद्याने ही माहिती दिल्याने न्यायालयात एकत खबळ उडाली आहे. या प्रकरणाची न्यायालयाने दखल घेतली असून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत


लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये होता. मात्र त्याच्यावरच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अनैसर्गिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जामिनाासाठी न्यायालयीन सुनावणी सुरू असताना आरोपीने ही आपबिती न्यायाधिशांना सांगितली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीची वैद्यकीय चाचणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश धंतोली पोलिसांना दिले आहेत. 


पीडित आरोपी हा गतिमंद असल्याने कारागृहातील रुग्णालयात तो उपचारासाठी गेला होता. यावेळी औषध देण्याच्या बहाण्याने तोंड दाबून तेथील एका कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा दावा आरोपीने केला आहे. तसेच मारहाण करण्यात आल्याचेही आरोपीने न्यायालयात सांगितले.  याबाबत न्यायालयाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.


नाशिक कारागृहामध्येही धक्कादायक प्रकार


नाशिकरोड येथील कारागृहात पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता एका बंदीवानाने त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सर्कल नंबर 5 मधील बॅरेक नंबर 1 मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित बंदीवान लघुशंकेसाठी गेला असता संशयित बंदीवानाने अनैसर्गिक अत्याचार केला. पीडित बंदीवानाच्या फिर्यादीनुसार रात्री कारागृहातील सर्कल नंबर 5 मधील डायरेक्ट क्रमांक एकमध्ये ही घटना घडली. फिर्यादी  बंदीवान शौचालयात लघुशंकेसाठी गेला असता संशयिताने त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पीडिताने तुरुंग रक्षकाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्यानी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.