पोटच्या बाळाचा 3 लाखांत सौदा, सतर्क पोलिसांकडून रॅकेटचा `असा` झाला करेक्ट गेम...
पाच दिवसाच्या बाळाची विक्री. महिला डॉक्टरसह नऊ जणांना अटक.
अमर काणे, झी २४ तास नागपूर :(Nagpur ) कुणी आपल्या आर्थिक फायद्यासाठी काय करेल याचा काही नेम नाही. लोकं पैशांसाठी कोणत्याही थाराला जाऊ शकतात. पैशांसाठी अगदी स्वःताच्या पोटच्या गोळ्याला विकायलाही लोकं मागे पुढे पाहत नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवघ्या पाच दिवसाच्या बाळाची तीन लाखात विक्री ( five days child sold ) करणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेने (Nagpur Crime Branch ) पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेली एक आरोपी स्वतः डॉक्टर आहे. ( nagpur crime story )
बाळ विक्री करणाऱ्या टोळीला मिळाली टीप
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याबाबत व्यवहार होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून या टोळीला ताब्यात घेतले. या टोळीत मुख्य आरोपी डॉक्टर कल्याणी थॉमस (Kalyani Thomas) तसेच वर्षा मेश्राम ( Varsha Meshram ) दलाल असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रेमविवाह (Love Marriage ) झालेल्या एका दांपत्याला बाळ झालं. त्यांना हे बाळ नको असल्याचं बाळ विक्री करणाऱ्या या टोळीने अचूक हेरलं. दरम्यान गुन्हे शाखेला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. डॉक्टर कल्याणी आणि वर्षाकडे एका दाम्पत्याचे नवजात बाळ असून ते त्या बाळाची विक्री करणार आहे.
पाच दिवसांच्या बाळाची किंमत तीन लाख
त्यामुळे गुन्हे शाखेच्या टीमने सापळा रचला. बाळ खरेदी करण्यास इच्छुक असं बनावट दाम्पत्य तयार केले. त्या दाम्पत्याने डॉक्टर कल्याणी आणि वर्षा या दोघींची भेट घेतली आणि त्यांचा विश्वास संपादित करत तीन लाखात सौदा निश्चित केला. या सौद्याकरता पोलिसांनी बनावट नोटांचे बंडलही तयार केलेत. त्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्गावर हा सौदा पार पाडण्याचं ठरलं. ठरलेल्या वेळेनुसार वर्षा तिथे बाळाला घेऊन पोहचली. पैसे घेतले आणि बाळाचा ताबा खरेदी करण्यास आलेल्या पोलिसांच्या बनावट दाम्पत्याला दिला.
रंगेहात पकडले गेलेत वर्षा आणि तिचे साथीदार
बाळाचा ताबा मिळताच दबा धरून बसलेल्या इतर पोलिस पथकाने वर्षा आणि तिच्या साथीदाराला अटक केली. त्यानंतर याप्रकरणी इतर सात जणांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत बाळ विक्रीच्या घटनांच्या मालिका उघडकीस येत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी हे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेने पुढे आहे.
nagpur crime story couple sold 5 days kid for three lakh police busted racket