अमर काणे, झी मीडिया, नागपूर : दिवाळी सुरु झाली आहे आणि फटाक्यांचा बार उडण्याआधीच पोलिसांनी इशारा दिला आहे. रात्री 10 नंतर फटाके फोडणाऱ्यांवर पोलीस थेट गुन्हे दाखल करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी 8 ते 10 अशी ठरवून दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे फटाके फोडायचे असल्यास वेळेचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नागपुर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 


नागपूर पोलिसांनी फटाके विक्री आणि फोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे. यासाठी शहरात 33 विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक पथक आणि गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. नागपुर पोलिसांनी पोलिसांनी फटाके फोडण्याची वेळ संध्याकाळी 8 ते 10 अशी ठरवून दिली आहे. 


तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फक्त ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी देखील फक्त ग्रीन फटाक्यांची खरेदी आणि विक्री करावी लागणार आहे. ग्राहकांनीही फटाके विकत घेताना, ते ग्रीन फटाके आहेत की नाही? याची खातरजमा करावी, असं आव्हान नागपुर पोलिसांनी यांनी केलं आहे.