नागपूर महापालिका नोकरीत कायम करीत नसल्याने कर्मचाऱ्यांचे आंदोलन
नागपूर महापालिका नोकरीत कायम करीत नसल्याने कर्मचाऱ्यांनी विधान भवनासमोर आंदोलन केले.
नागपूर : नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत एका व्यक्तीने विधान भवनाच्या मुख्य प्रवेश द्वारा बाहेर घोषणाबाजी देत आत्महत्येचा इशारा दिला. पोलिसांनी वेळीच त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. प्रकाश बरडे असे आंदोलनकारी व्यक्तीचे नाव आहे. महापालिकेत कार्यरत असलेल्या १७ कर्मचाऱ्यांना विविध प्रशासकीय कारणास्तव नोकरीतून कमी करण्यात आले होते. ज्यानंतर हे लोक कोर्टात गेले. कोर्टाने नोकरीत घेण्याचे आदेश देऊनही नागपूर महापालिका नोकरीत कायम करीत नसल्याचा आरोप आंदोलन कर्त्याने केला.