अमर काणे, झी २४ तास, नागपूर : सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळे जुगाड करत असतात. मात्र नागपूरच्या पठ्ठ्याने एक भन्नाट गोष्ट केली आहे. याची दखल घेऊन त्याच्या नावावर विक्रम नोंदवण्यात आला आहे. नागपूरच्या या हेअर स्टायलिस्टनं जे काही केलं आहे. ते पाहून तुमची बोटं आश्चर्यानं तोंडात गेल्याशिवाय राहणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट शिवा खापरकर यांनी आपल्या नावावर अनोखा विक्रम ठेवला आहे. साधारण कटिंग करताना हेअर स्टायलिस्ट एक कात्री वापरतो. मात्र शिवा खापरकर यांची बातच न्यारी आहे. एका हातात दहा कात्र्या आणि दुसऱ्या हातात दहा कात्र्या अश्या तब्बल वीस कात्र्या दोन्ही हातात धरून शिवा यांनी दोघांची हेअर कटींग करण्याचं किमया साधली. 



नागपुरातील नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात शनिवारी त्यांनी हे अफलातून कौशल्य दाखवलं. मूळचा अकोल्याचा असलेल्या शिवानं यापूर्वी 11 कात्र्या एकत्रित धरुन केस कापण्याचा विक्रम केला होता.


शिवाय 20 तासात 407 कटींग करत 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपलं नाव देखील कोरलं होतं. शिवा यांचं हे आगळंवेगळं कौशल्य पाहण्यासाठी नाभिक समाजातील अनेक जण उपस्थित होते. शिवाची अदाकारी पाहून ते देखील चकीत झाले नसते तरच नवलच म्हणायला हवं.