Nagpur Hit and Run : मुंबई, पुण्यानंतर उपराजधानी नागपूर हिट अँड रनमुळे हादरलंय. गेल्या 24 तासांमध्ये हिट अँड रनच्या 3 घटना समोर आल्या आहेत. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या परिसरात 2 घटना घडल्यायत. एका घटनेत बाईकस्वार तरुणाचा जीव गेला तर दुसऱ्या घटनेत रेल्वेतील अधिकारी गंभीर जखमी झालेत. राहुल खैरनार हा तरुण सांदिपनी शाळेजवळ दाभा रिंग रोड इथून जात होता. त्यावेळी आऊटर रिंग रोडवर अज्ञात वाहनानं त्याला उडविले. तर दुसरी घटनेत वायुसेना नगर ते तेलंखडी हनुमान मंदिर या मार्गावर घडली. रेल्वे अधिकारी असलेल्या प्रवीण गांधी यांना एका अज्ञात कारचालकानं बॉटनिकल गार्डनजवळ कारनं धडक दिली यात ते जखमी झाले. कारचालक मात्र तिथून पळून गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसरी घटना अतिशय धक्कादायक आहे. दिवसाढवळा भरधाव वेगाने स्कूल बसने एका सायकल स्वार वृद्धाला चिरडलंय. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. रत्नाकर रामचंद्र दीक्षित यांचा उपचारादरम्यान निधन झालंय. दीक्षित आठ जुलैला सकाळी नऊच्या सुमारास सायकलने छोटा ताजबाग ते तुकडोजी चौक या मार्गाने जात होते. या दरम्यान मागून येणाऱ्या स्कूल बसने त्यांना उडविलं. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात स्कूल बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या स्कूल बस चालकाला पोलिसांनी अटक केलीय. 


कोराडी मार्गावर कारला भीषण अपघात !


नागपूर जिल्ह्यातील नागपूर कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (9 जुलै 2024) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास तीव्र गतीने येणारी एक स्विफ्ट कार रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रेलिंगला धडकली आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन स्विफ्ट कार अनेक पलटी घेतल्यानंतर अनेक मीटर लांब जाऊन थांबली. जखमींना नागपूरच्या दोन वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.