नागपूर : 'झुंड' सिनेमाच्या चित्रिकरणासाठी बिग बी अमिताभ बच्चन दाखल झालेत. त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, त्यांचे दर्शन झाले नाही. परंतु त्यांची कसर शशिकांत पेडवालनी यांनी भरुन काढली. त्यामुळे अमिताभचे चाहते खूप खूश आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बी' अमिताभ बच्चन नागपुरात दाखल झाले आहेत. 'झुंड' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन नागपुरात आल्याचे समजल्यानंतर त्यांच्या गाडी भोवती चाहत्यांची एकच झुंबड उडाली. मात्र, गाडीच्या बंद काचामुळे त्यांचे दर्शन झाले नाही. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड'  चित्रपटाचं चित्रिकरण नागपुरात होणार आहे. त्याकरिता बी एका प्रमुख भूमिकेत असून त्यांचं चित्रकरण होत आहे.


झोपडपट्टी फुटबॉल सुरु करणारे क्रीडाशिक्षक विजय बारसे यांच्यावर 'झुंड' चित्रपट आधारित आहे. बारसे हे झोपडपट्ट्यांमधील मुलांना फूटबॉल शिकवतात. या चित्रपटात त्यांची क्रीडाप्रशिक्षकाची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार आहेत. बीग बी सध्या नागपुरातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामी आहे.