नागपूर : महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. Coronavirusच्या विळख्यात आलेल्यांच्या मृत्यूचा आकडाही सध्या चिंतेत टाकणारी बाब ठरत आहे. पण, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार नागपूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे ही बाब सध्या दिलासा देऊन जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरात कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या आणि त्यामुळे मृत्यू झालेल्या ६८ वर्षीय वृद्ध रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मेयो रुग्णालयातील जवळपास १५ डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 


काही दिवसांपूर्वी हा वृद्ध मेयो रुग्णालयात सामान्य रुग्ण म्हणून उपचारासाठी आला होता. ज्यानंतर न्यूमोनिया सदृश लक्षणामुळे त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर झालेल्या झालेल्या कोरोना चाचणीत तो कोरोना पॉसिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर आणि परिचारिका संशयाच्या भोवऱ्यात आले होते.



 


कोरोनाची दहशत आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग पाहता, त्यांचीही चाचणी करण्यात आली. पण, आता मात्र या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे नागपुरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. असं असलं तरीही येत्या काळात नियमांनुसार सावधगिरी बाळगत या सर्वांनाच पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.