अमर काणे, नागपूर : नागपूर मेट्रोच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणारी बातमी पुढे आली आहे. नागपूरच्या धावत्या मेट्रोत चक्क बिभत्स डान्स आणि जुगाराचा डाव रंगल्याचा प्रकार समोर आला आहे. झालेल्या प्रकारानं नागपूरकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोत चक्क जुगाराचा अड्डा रंगला होता. 3 हजारांत नागपूर मेट्रोच्या इज्जतीचा लिलाव करण्यात आला. व्हिडिओमध्ये जुगाराचा रंगलेला डाव पाहा. आणि हा पोल डान्स एखाद्या पब आणि डान्सबारमधला नाही बरं का?... हा पोल डान्स आहे नागपुरातल्या मेट्रोतला. नागपुरात सेलिब्रेशन ऑन व्हिल या उपक्रमांतर्गत शेखर शिरभाते यानं वाढदिवस साजरा करण्यासाठी 3 हजार 50 रुपये भाडं देऊन एका तासासाठी मेट्रो बुक केली. या दरम्यान त्यानं मेट्रोत तृतियपंथीयांकडून डान्स करवून घेतला. हे कमी की काय पत्त्यांचा डावही रंगला. झालेल्या प्रकारामुळं नागपूरकरांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.



दुसरीकडं महामेट्रो मात्र धिंगाणा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मानसिकतेत नाही. मेट्रोची प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्यांवर प्रवासबंदी घालण्याचा मेट्रोचा विचार आहे.


महामेट्रो नागपूरकरांची शान आहे. तिच्या प्रतिष्ठेला बट्टा लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा केली जाते आहे.