नागपूर : नागपूर मेट्रोचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे' लोकार्पण करण्यात येणार आहे. वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रोला दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहणार आहे. मेट्रो लोकार्पण कार्यक्रमाला दुपारी ४ वाजता सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्घाटनानंतर मेट्रो एअरपोर्ट साऊथ ते खापरीपर्यंत धावणार आहे. शुक्रवारी ८ मार्चला 'महामेट्रो आभार दिन' म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी नागपूरकरांना मेट्रोचा नि:शुल्क प्रवास घडणार आहे. 


शुक्रवारपासून मेट्रो खापरी ते सीताबर्डी या १३ किमी मार्गावर धावणार आहे. शनिवारी ९ मार्चपासून सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक प्रवास एक महिना सवलतीच्या दरात सुरू होईल. खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट हे मेट्रो स्टेशन पूर्णपणे सज्ज झाली आहे.