नागपूरच्या मॉडर्न प्राथमिक शाळेचा आगळावेगळा किल्ला
आगवेगळा किल्ला
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी सुरक्षितता, आधुनिकता आणि स्वयंपूर्ण असा किल्ला कसा तयार असता. हाच विचार समोर ठेऊन नागपूरच्या मॉडर्न प्राथमिक शाळेने एक आगळावेगळा किल्ला निर्माण केला आहे.
फक्त ऐतिहासिक किल्ले निर्माण न करता चिमुकल्यांना खऱ्या अर्थाने इतिहासाची गोडी लागावी. किल्ल्यांबद्दल त्यांची कल्पकता आणखी विकसित व्हावी असे हेतू समोर ठेऊन गेली अनेक वर्षे मॉडर्न शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काल्पनिक किल्ले तयार करतात. यावर्षी शाळेत 'त्रिमेरूदुर्ग' हे तीन टेकड्यांवर विस्तारलेले किल्ले निर्माण करण्यात आलेत.
शिवकालीन किल्याचे सर्व बारकावे,भौगोलिक काठीण्य,उंच-सखलता अशा गोष्टी तर आहेच. त्याशिवाय किल्ल्यात राहणाऱ्या गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आधुनिक सोयी,उर्जा स्त्रोत कसे असावे हे देखील या काल्पनिक किल्ल्यात पाहायला मिळतात.