कसारा येथे दुरांतो एक्स्प्रेसला अपघात, सात डब्बे घसरलेत
कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला. गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात. वाहतूक ठप्प पडलेय.
मुंबई : कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला. गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात. वाहतूक ठप्प पडलेय.
आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानकादरम्यान रुळावर पावसामुळे दगड-माती आल्यामुळे सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. जोरदार पाऊस आणि धुक्यामुळे चालकाला आंदाज आला नाही. चालकानं प्रसंगावधान दाखवून लगेच ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
मुंबई - कसारा घाटाजवळ दुरंतो एक्सप्रेसचे इंजिन, ए.च - १, ए १ आणि ए २ यासह सात डब्बे रुळावरुन घसरले आहेत. यामुळे मुंबईकडे येणारी अप आणि-डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातात कोणत्याही जिवीतहानी झालेली नोही. मात्र अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
रुळावरुन घसरलेल्या डब्ब्यातून जखमी प्रवाशांना बाहेर काढत असल्याचे चित्र सध्या तिथे आहे. रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.
दुरांतो एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे आमदार वा. को. गाणार , माजी आमदार डॉ. खुशाल बोभचे आणि आशिष जैयस्वाल सुरक्षित आहेत, असे माहिती देण्यात आली.