पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : जगभरातील देशांमधील उपासमारीच्या परिस्थितीवरील अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला होता. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या (global hunger index) अहवालाने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताला (India) 107 वं स्थान मिळालं होतं. 2021मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत 101व्या स्थानावर होता. मात्र या वर्षी भारत 107 व्या स्थानावर पोहोचला आहे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान (Pakistan) आणि भारताचा शेजारी नेपाळ (Nepal) यांच्यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतात असल्याचं या निर्देशांकावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भारतात उपासमारीचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून आलं आहे. अनेक जण उरलेले अन्न तसेच फेकून देत असल्याचे आपण नेहमीच पाहतो. मात्र गरजूंना ते मिळत नाही. उपाशीपोटीच अनेकांना राहावं लागतं. मात्र आता रस्त्यावर अन्न फेकणाऱ्यांना कारवाईला सामोर जावं लागणार आहे. (Nagpur Municipal Corporation warns if food is thrown in the open fine of one lakh will be imposed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता नागपूर (Nagpur) महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. शहरात अस्वच्छेतून विद्रुपीकरण होत असल्यानं नागपूर (Nagpur) महानगर पालिकेने आता कंबर कसली आहे. उघड्यावर अन्न (Food) फेकऱ्यांना आता एक लाखापर्यंत दंड (Fine) ठोठावण्याचा इशारा नागपूर महापालिकेने दिला आहे. शहारत ठिक ठिकाणी उपद्रव पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात असताना एका व्यक्तीवर कारवाई करत पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.


त्यामुळे आता मंगल कार्यलय, हॉटेल, रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणारे असो की अन्य कोणीही उघड्यावर अन्न फेकल्यास 1 लाखाचा दंड भरावा लागणार आहे. याच अन्नावर भटके कुत्रे ताव मारून हिंसक होत असल्याचे दिसून आले आहे. या निर्णयानंतर आता शहरही स्वच्छ व सुंदर बनवण्यास मद होणार आहे.