नागपूर : जिल्ह्यातील लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहिमेला अधिक बल मिळावं यादृष्टीनं  नागपूर महानगर पालिकेला स्वनिधीतून लस खऱेदी करण्याची परवानगी द्यावी, असी विनंती करणार पत्र महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना पाठवले आहे. नागपूर शहरात कोरोनाचा (Coronavirus) मोठा प्रकोप सुरु असताना दुसरीकडे लस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात तिसरी लाट सुद्धा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या युद्धात लस हेच मोठे शस्त्र असून तिसऱ्या लाटेपूर्वी नागपूर शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे.  त्याकरिता केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्याव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिका स्वनिधीतून लस खरेदी करण्यास तयार आहे. त्यासाठी परवानगी देण्याची विनंती करणार पत्र महापौर दयाशंकर तिवारी यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. यामुळं नागपूर शहरातील लसीकरणाला गती प्रदान होईल व सर्व नागपूरकरांचे लसीकरण गतीशीलतेने पूर्ण होउ शकेल असं महापौर म्हणाले. 
 
या लस खेरेदीकरता नागपूर महानगरपालिका 10 कोटी निधी खर्च करण्यास तयार असून पुढे पुढे सुद्धा निधीची व्यवस्था केली जाईल, असे पत्रात नमूद केले असल्याचेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.  संपूर्ण नागपूरकरांचे सुरळीत लसीकरण व्हावे यासाठी लस खरेदीसाठी निधीच्या संकलनासाठी शहरातील सर्व खासदार, आमदार, नगरसेवक यांना विनंती करण्यात आले असल्याचे सुद्धा महापौरांनी सांगितले. शहरातील सर्व नगरसेवकांनी त्यांच्या विकास निधीतून 10 लाख रुपये तसेच इच्छूक नगरसेवकांनी आपल्या मानधनातील काही निधी लस खरेदी करण्यासाठी ‘महापौर सहायता निधी’मध्ये देण्यासाठी पत्र द्यावे.  सर्व नगरसेवकांनी स्वेच्छेने विकास निधी अथवा अन्य निधीमधून 10 लाख रूपये दिल्यास लस खरेदी करण्यासाठी मनपाकडे १५ कोटी रुपयांची व्यवस्था होईल.


 याशिवाय शहरातील सर्व खासदार यांनी त्यांच्या खासदार निधीतून रुपये दोन कोटी तर आमदारांनी आमदार निधीतून रुपये एक कोटी चे सहकार्य करण्याबाबत पत्र देण्यात आले.  त्या पत्राला त्वरीत प्रतिसाद देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रवीण दटके व आमदार  मोहन मते यांनी प्रत्येकी 1 कोटी निधी देण्याचे पत्र दिले आहे.