बैलबुद्धी म्हटल्याने दोघा मित्रात वाद, भांडण सोडविणाऱ्या मित्राचीच केली हत्या
Nagpur Murder : बैलबुद्ध म्हटल्याच्या वादातून मित्राने मित्राची हत्या ( Friend Murder at Nagpur) केल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.
नागपूर : Nagpur Murder : बैलबुद्ध म्हटल्याच्या वादातून मित्राने मित्राची हत्या ( Friend Murder at Nagpur) केल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.तुषार बैस असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आकाश गौड असे आरोपी मित्राचे नाव आहे. तर अरुण अवस्थी यामधील दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. गळवारी रात्री पार्टीनंतर मित्रांमध्ये झालेल्या वादातून हत्येची ही घटना घडली आहे. (Friend Dispute and Murder in Nagpur)
तुषार, आकाश आणि अरुण अवस्थी यांची मंगळवारी रात्री व्यंकटेशनगर येथील मित्राच्या फ्लॅटमध्ये पार्टी रंगली होती. त्यांची ही पार्टी चांगली रंगात आली असताना सर्वांनाच झिंग चढली होती. गीतांची मैफल रंगली होती. याच मैफलीत आवडीचे गाणे लावण्यावरून या मित्रांमध्ये वाद रंगला. (Dispute Between Two Friends ) आकाशने रागाच्या भरात अरुणला शिवीगाळ करून गाण्याच्या गायकाचे नाव विचारले. अरुणला नावसांगता आले नाही. अशातच, आकाशने त्याला बैलबुद्धी म्हणून चिडवले. त्यामुळे चिडलेल्या अरुण आणि आकाश दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यावेळी मध्यस्थीसाठी तुषार धावून आला. मात्र त्यावेळी वाद शांत झाला.
त्यानंतर तुषार, आकाश आणि अरुण हे आपापल्या घरी जाण्यास निघाले. घराजवळ पुन्हा त्या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी देखील तुषार याने पुन्हा मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आकाशला तुषार याचा राग आला. परिणामी त्याने सरळ घरात जाऊन चाकू आणला आणि तुषार याच्या छातीवर वार केला. यात रक्तबंबाळ झालेला तुषार रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. तुषारची अवस्था बघता अरुण आणि आकाशने त्याला गाडीवर टाकून उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलला नेले. तेथे त्याचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.