अमर काणे, प्रतिनिधी, नागपूर : मोबाईलवर 'हॉरर' चित्रपट पाहून एका 8 वर्षाच्या चिमुकल्याने बाहुलीला फाशी दिली. तसाच प्रयोग करत त्याने स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही एका अकरा वर्षांच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल देत नसल्याने आत्महत्या
मोबाईल मिळत नाही म्हणून एका लहानग्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. साहिल मेश्राम असं आत्महत्या केलेल्या अकरा वर्षीय बालकाचं नाव आहे.साहिलने गळफास घेऊन आत्महत्या केली. साहिलच्या जाण्याने त्याच्या आई-बाबांना जबर धक्का बसला आहे. 


लहान वयात मुलांच्या हाती मोबाईल
अगदी लहान वयातच आज-काल मुलांच्या हातात मोबाईल दिसतात. मैदानावर जाऊन खेळण्याऐवजी अनेक मुलं मोबाईलच्या आहारी गेली आहेत. त्याचे दुष्परिणाम वारंवार समाजापुढे येत असतात. व्यस्त जीवनशैलीत अनेक पालकही मुलांना लागलेल्या मोबाईलच्या व्यसनाकडे दुर्लक्ष करताता. मात्र अशा अघटीत घटना घडल्यावर पालकांचे डोळे उघडतात. 


नागपुर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरणापूर इथं राहणाऱ्या मेश्राम कुटुंबाला मुलाच्या मोबाईल व्यसनाकडे दुर्लक्ष करणे यामुळे मोठी किंमत मोजावी लागली. भोलाजी मेश्राम यांचा 11 वर्षीय मुलगा साहिल मोबाईलवर गेम खेळणे आणि व्हिडिओ पाहण्याचा व्यसन लागलं होतं. 


मोबाईलवर तासंतास व्हिडीओ पाहणे आणि गेम खेळणे याच्यात त्याचा दिवस जायचा. मंगळवारी त्याचे आई-वडील कामाला बाहेर गेले होते. तर भावाने त्याला मोबाईल देन्यास मनाई केली. आजूबाजूचे कोणीच त्याला मोबाईल देत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या साहिलने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी खापा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे