नागपूर : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सरकारवर हल्ला केलाय. फिस्कटलेलं चॅलेंज, शेतकरी कर्जमाफी, महागाई, बेरोजगारी या मुद्यांवर व्यंगचित्रांचे बॅनर तयार करून विरोधकांनी सरकारला चिमटे काढले आहेत.