नागपूरकरांना धुळीचा धोका, पालिकेनं लक्ष देण्याची गरज
उखडलेल्या खडी मुळे रस्त्यावरून जाताना धुळीचा त्रास होतोय.
जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : नागपूरकरांच्या आरोग्याला सध्या धुळीमुळे धोका निर्माण झालाय... पाऊस आणि विकासकामं यांच्यामुळे सगळीकडे धूळच धूळ झालीय. नागपूरच्या रस्त्यांची अवस्था गंभीर बनत चाललीयं. नागपूर शहरात ६ जुलैला मुसळधार पाऊस झाला... या जोरदार पावसानं डांबरी रस्त्यांची पार वाट लावली.... उखडलेल्या खडी मुळे रस्त्यावरून जाताना धुळीचा त्रास होतोय.
पालिकेनं लक्ष देण्याची गरज
धुळीच्या कणांचा आकार जर १० मायक्रॉन असेल तर ते नाक आणि घशात अडकून राहतात... मात्र त्यापेक्षा कमी आकाराचे कण हे फुफ्फुसापर्यंत आत जाऊन गंभीर रोग उद्भवण्याचा धोका असतो... हे कण विषारी असतील तर गंभीर रोग होण्याचा धोका जास्त असतो.... आता लवकरच डागडुजी करू, असं उत्तर महापालिकेनं दिलंय.
नागपुर शहरात मेट्रोसह बरीच विकासकामं मोठ्या प्रमाणात सुरु आहेत... पण त्यामुळे धुळीचा धोका वाढलाय... महापालिकेनं वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे.