नागपूर : कुख्यात गुंडासह डान्स करणा-या पोलीस शिपाई जयंता शेलोटेला निलंबित करण्यात आले आहे. जयंता शेलोटेचा ताज बागमधील गुंड आबू आणि जुगार अड्डा चालणारा तडीपार गुंड अशोक बावाजी यांच्यासह केलेल्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलीस गुंडाच्या पार्टीत डान्स करत असल्याच्या या व्हीडिओबाबत पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी सर्वसामान्य नागपुरकरांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. दरम्यान याप्रकरणी आता जयंता शेलोटेच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.