नागपूर : Nagpur City Police Recruitment : पोलीस भरतीत नवीन माहिती पुढे आली आहे. नागपूर शहर पोलीस भरतीत मूळ उमेदवार ऐवजी डमी उमेदवारांनकडून परीक्षा देऊन भरती प्रक्रियेत घोळ घातल्याप्रकरणी अजून 8 ते 10 उमेदवार  पोलिसांच्या रडारवर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पोलीस भरती रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने जयपाल कंकरवाल, अर्जुन सुलाने आणि तेजस जाधव या तीन आरोपींना अटक केलीय. याप्रकरणी पुढील 2 ते 3 दिवसात अजून काही आरोपींना अटकेची शक्यता आहे. 


इतर शासकीय विभागात हे रॅकेटने भरतीच्या करता सक्रिय होते का, याचा तपासही पोलीस करत आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर नागपूर शहर पोलीस पदाची भरती घेण्यात आली. यावेळी संपूर्ण भरती प्रक्रिया व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्हीत चित्रित करण्यात आली होती.


या भरती प्रक्रियेचे चित्रीकरण तपासत असताना काही उमेदवारांवर संशय आला.  मूळ उमेदवाराएवजी डमी उमेदवारांनी लेखी आणि शारीरिक परीक्षा दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी पडताळणी केली असता  12 ते 13 लाखात मूळ उमेदवाराएवजी  डमी उमेदवाराला पोलीस भरती परीक्षांना पाठवून पास करुन देण्यासाठी एक टोळी सक्रिय असल्याचे तपासात समोर आले.


त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असली तरी पुढील तपासामध्ये अजून काही अटक याप्रकरणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आता पोलीस डमी उमेदवारांबाबत मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.