नागपूर पोलिसांनी जप्त केले ३ कोटी रूपये, हवालाची रक्कम असल्याचा संशय...
रविवारी मध्यरात्री रायपुरहून नागपूरला एका डस्टर कार मधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला
जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : छत्तीसगडच्या रायपूरहून चारचाकी वाहनात आणलेली सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड नागपूर पोलिसांनी सापळा रचून पकडली. ही रक्कम हवाल्याची असल्याचा संशय पोलिसांना आहे. रायपुरचे सराफा व्यापारी खजान ठक्कर यांची ही रोकड असून नागपूरच्या एका व्यापा-याकडे त्यानं ही रक्कम हवालाच्या माध्यमातून आणल्याचं सांगितले जातंय. रायपुरहून नागपूरला एका डस्टर कारमधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला. प्रशांत केसांनी याच्या मालकीची ही कार असल्याची माहीती त्या दोघांनी पोलिसांना दिली. लॉकर उघडल्यावर त्यात २ हजार, पाचशे आणि दोनशेच्या नोटांची बंडल होती. गाडीतून एकूण तीन कोटी 22 लाख रुपये होती.
सापळा रचून कारवाई
छत्तीसगडच्या रायपुर हून चारचाकी वाहनात आणलेली सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड नागपूर पोलिसांनी सापळा लाऊन पकडली. ही रक्कम हवालाची असल्याचा संशय पोलिसांना आहे. रायपुर चे सराफा व्यापारी खजान ठक्कर यांची ही रोकड असून, नागपूरच्या एका व्यापाऱ्याकडे त्याने ही रक्कम हवालाच्या माध्यमातून आणल्याचे सांगितले जात आहे. रविवारी मध्यरात्री रायपुरहून नागपूरला एका डस्टर कार मधून रोकड येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली. या सूचनेच्या आधारावर पारडी मार्गावर पोलिसांनी सापळा लावला. त्यावेळी कार मध्ये राजेश मेंढे व नवनीत जैन हे दोघेजण होते.
गाडीच्या डिक्कीला कुलुपबंद कप्पे
पोलिसांनी कार पोलीस स्टेशनला आणून तपासणी केली असता डिक्की व सीटच्या खाली विशिष्ट कुलुपबंद कप्पे तयार केल्याचे पोलिसांना आढळले.. प्रशांत केसांनी याच्या मालकीची ही कार असल्याची माहीती त्या दोघांनी पोलिसांना दिली. लॉकर उघडल्यावर त्यात २ हजार, पाचशे व दोनशेच्या नोटांची बंडल होती. गाडीतून एकूण ३ कोटी २२ लाख रुपये मिळाले. या प्रकरणी पोलिसांनी आयकर विभागाला घटनेची माहीती दिली असून पुढील तपास करीत आहेत.