नागपूर : द्वेष, हिंसेकडून शांततेकडे जायला हवं असं आवाहन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय. नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपिठावरून ते बोलत होते. सुखी, आनंदी आयुष्य प्रत्येकाचा हक्क आहे. आनंदाच्या निर्देशांकात भारत मागे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रणव मुखर्जींच्या संघव्यासपीठावर उपस्थित राहण्यावरुन काँग्रेसमधल्या बऱ्याच जणांना धक्का बसलाय.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींच्या उपस्थितीमुळं सुरू करण्यात आलेला वाद निरर्थक आहे, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. नागपूरच्या संघ मुख्यालयात शिक्षा वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सरसंघचालक सर्वात शेवटी बोलतात. मात्र माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी या प्रथेमध्ये बदल करण्यात आला.