उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकरणांची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप होता ती खासगी होती. त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार होता असं वाटत नाही असं सांगत कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं. याचिकाकर्ते सतीश उके हे सुद्धा कारागृहातून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीला हजर होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप होता. अ‍ॅड. सतीश उके यांनी हा आरोप केला होता. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज त्याप्रकरणी निर्णय देण्यात आला आहे. कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना दोषमुक्त केलं आहे. 


2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवली असा आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी याचिकेतून केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांनी नजरचुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते असा दावा केला होता. 


कोर्टाने निर्णय देताना सांगितलं आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवली होती असा आरोप करण्यात आला ती खासगी प्रकऱणं होती. त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार होता असं वाटत नाही. त्यामुळे त्यांना दोषमुक्त करण्यात येत आहे. 


याचिका करणारे अ‍ॅड. सतीश उके हेदेखील या सुनावणीसाठी हजर होते. ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी कारागृहातून सुनावणीला हजेरी लावली.