नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान नागपुरात दाखल झाले आहेत. पक्षाचे आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. देवगिरी बंगल्यावर शरद पवार हे पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेषतः विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ सदस्यांशी शरद पवार संवाद साधतायत. यात प्रामुख्याने माजी मंत्री मनोहर नाईक, माजी खासदार दत्ता मेघे यांनी शरद पवारांची भेट घेतली. 



याशिवाय आमदार रोहित पवार हे देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आहेत. कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला होता. अजित पवार हे देखील देवगिरीवर शरद पवार यांच्या भेटीला आले होते.