वाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला
वाळू माफियांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला आहे.
नागपूर : जिल्ह्यातील उमरेड येथे वाळू माफियांनी तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला केला आहे. वाळू माफियांनी नायब तहसीलदार शिंदे यांच्या अंगावर डंपर नेण्याचा प्रयत्न केला. तर तहसीलदार प्रमोद कदम वाळूच्या डंपरवर कारवाई करण्यासाठी ड्रायव्हरच्या बाजूनं चढले असताना चालकानं सुमारे 20 किलोमीट त्यांना डंपरवर अडकवून तसाच सुसाय घेवून गेला. सुदैवानं प्रमोद कदम यांनी डंपरची गती धीमी झाली असताना उडी मारल्यानं त्यांचा जीव वाचला.
आज सकाळी तहसीलदार प्रमोद कदम, नायब तहसिलदार योगेश शिंदे यांना पवनी नदी घाटातून वाळू माफिया अवैधरित्या वाळू घेवून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी वाळू भरलेला डंपर उमरेड रेल्वे क्रासिंगवर थांबवला. तहसीलदार प्रमोद कदम यांनी डंपरला थांबवला.
दरम्यान चालकानं शिंदे यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी तात्काळ ड्रायव्हरच्या बाजूनं चढून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्रायव्हरने दार बंद केल. कदम यांना तसेच अडकलेल्या अवस्थेत ठेवून सुमारे पंधरा किलोमीटर त्यांना तसाच घेऊन गेला. मात्र प्रसंगावधान राखत तहसिलदारांनी डंपरची गती धीमी होताच उडी मारल्यानं त्यांचा जीव वाचला.