नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. विद्यापीठातील कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे १ ऑक्टोबरबासून सुरु होणा-या अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.मात्र, कर्मचार्‍यांनी संप मागे घेताच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन ऑनलाईन परीक्षांच्या तोंडावर विद्यापीठी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरु केले होते. त्यामुळे १ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या अंतिम वर्ष परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. मात्र आता कर्मचा-यांचे आंदोलन स्थगित केल्यानंतर विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा परीक्षा ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पार पडणार आहेत. विद्यापीठाची याबाबत पूर्ण तयारी झाली आहे.


मात्र, परीक्षा अॅपसंदर्भात अद्यापही विद्यापीठाकडे तक्रारी येत आहेत. काही विद्यार्थ्यांना हे परीक्षा अॅप डाउनलोड होत नसल्याच्या तक्रारी केल्या आहे. दरम्यान विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवल्या जातील व सुरळीत परीक्षा होतील असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी १९ ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.