जितेंद्र शिंगाडे, झी २४ तास, नागपूर : नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या नव्या अभ्यासक्रमात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माणामधील भूमिका' असा पाठ पढवला जाणार आहे. बीए द्वितीय वर्षाच्या सेमिस्टर-४ मधील युनिट-३ चा पहिलाच मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र निर्माणातील भूमिकेवर आहे. विद्यापीठाच्या 'ह्यूमेनिटीस' या विषयांच्या अभ्यासक्रमाच्या यादीत हे नमूद आहे. 


फाईल फोटो

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या अभ्यासक्रमात सेमिस्टर-४ च्या युनिट-३ चा पहिला मुद्दा होता 'राईज एन्ड ग्रोथ ऑफ कम्युनिलिजम' अर्थात 'सांप्रदायिकतेचा उदय आणि वाढ'... परंतु, आता मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठात आरएसएसचा इतिहास शिकवला जाणार आहे. 


फाईल फोटो

दरम्यान, या विषयावर विद्यापीठाच्या कला शाखेतील विषयांचे डीन प्राध्यापक प्रमोद शर्मा यांना फोनवर विचारणा केली. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तर अभ्यासक्रमात असे बदल करण्याबद्दल कुठलाच प्रस्ताव नसल्याचं मत व्यक्त केलं. मात्र, ज्यावेळी त्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर बीए द्वितीय वर्षाच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमात सविस्तर ४ मधील युनिट ३ मध्ये असा बदल नमूद असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी हे माझ्या कार्यकाळात म्हणजेच गेल्या ८ महिन्यात झालेलं नसून त्याच्या पूर्वी झालं असेल असं सांगत हात झटकून घेतले. आधीच्या डीनच्या कार्यकाळाबद्दल मी भाष्य करणार नाही असेही ते फोनवर म्हणाले. आता यावरून वाद होण्याची शक्यता आहे.