हरणांच्या कळपाला पाहून बिबट्याने का ठोकली धूम? पाहा व्हिडीओ
शिकाऱ्याचीच शिकार होता होता राहिली ... हरणांना पाहून बिबट्याची पळताभुई थोडी झाली... पाहा महाराष्ट्रातला शिकारीचा खास व्हिडीओ
अमर काणे, झी 24 तास, नागपूर : वाघ-बिबट्या किंवा सिंहच्या शिकारीचे थरारक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर येत असतात. दबा धरून शिकार केल्याचे किंवा कळपात घुसून देखील शिकार करण्याचं धाडस या प्राण्यांमध्ये असतं. मात्र एकीचं बळ काय असतं ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
एकजुटीनं हरणांनी चक्क बिबट्याला पळताभुई थोडी केली. बिबट्याला घाम फुटला आणि उपाशीपोटीच शिकार न करता पळ काढण्याची वेळ आली. हरणांच्या कळपाला पाहून बिबट घाबरल्याचं चित्र पेंच व्याघ्र प्रकल्पात सफारीला आलेल्या पर्यटकांना पाहायला मिळालं.
वन्य प्राण्यांमध्ये मॉबिंगचा प्रकार अनेकदा जंगलात चालतो. मात्र गुरुवारी पेंच सिल्लारी येथे सफरीला आलेल्या पर्यटकांना मॉबिंगचा हा प्रकार प्रत्यक्ष पाहता आला आणि मोबाईलमध्ये कैद करता आला.
पेंचमधील सिल्लारी गेटजवळ हरणांचा कळप जोराने आवाज करून बिबटला पळवून लावत असल्याचे दृश्य पर्यटकांना पहायला मिळाले. हरणांच्या कळपाच्या आवाजाने बिबट त्यांच्यापासून दूर जात असल्याच पर्यटकानी पहायले.
हरणांचा एक कळप जोरात आवाज करत बिबट्याच्या दिशेने जात असल्याचं दिसलं. कळपाने केलेली ही युक्ती कामी आली आणि घाबरलेला बिबट्याने धूम ठोकली.
जंगलातील मॉबिंगन म्हणजे काय ?
तृणभक्षी प्राणी कळपाने आवाज करत हिंस्र प्राण्याला हिसकावून लावण्याच्या या जंगलातील प्रकाराला मॉबिंग असे म्हणतात. अनेकदा हरिण, सांबरसारखे प्राणी जीव वाचवण्याच्या दृष्टीने असे कळपाने मॉबिंग करत असतात.
नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प येथील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाघ व बिबट्या शिकार करताना पाहण्याची अपेक्षा घेऊन गेलेले पर्यटकांनी हरणांच्या आवाजाने बिबट्या घाबरून पळ काढत असल्याचं पाहायला मिळालं.