Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन केले. त्याआधी विरोधी पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केले आहे. मात्र परिषदेच्या कामकाजात विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार आहे.


जयंत पाटलांचं निलंबन, मविआचा आक्रमकपणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयंत पाटलांचं निलंबन मागे घ्यावं, त्यांना सभागृहात बसू द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीय. पाटलांवरील कारवाई मागे घेतल्याशिवाय सभागृहात जाणार नाही असा आक्रमक पवित्रा मविआने घेतलाय. तर आदित्य ठाकरे यांनी विधानसभेमध्ये सत्ताधारी विरोधकांना कामच करू देत नाहीत, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केलीय.


सीमावादावर सरकार ठराव का आणत नाही?


महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सरकार ठराव का आणत नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला आहे. कर्नाटक विधानसभेत सीमावादावर ठराव मंजूर करण्यात आलाय. कामकाज सल्लागार समितीत हिवाळी अधिवेशनात ठराव मंजूर करू असं सांगण्यात आलं. मात्र राज्यात विधिमंडळात कोणत्याही प्रकारचा ठराव अजूनही आला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का गप्प आहेत असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विचारला. 


हिवाळी अधिवेशनात एकमेकांवर आरोप करून कामकाज तहकूब करणं अयोग्य आहे असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, काल ठाण्यात आंदोलनात दिल्लीचे मिंधे एकनाथ शिंदे अशा घोषणा देण्यात आल्या म्हणून 8 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. भ्रष्टाचाराविरोधात बोलणा-यांवर सरकार गुन्हे दाखल करत आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 


अरे काय चाललंय... ज्यूसची भांडी टॉयलेटमध्ये धुतली


नागपुरात विधिमंडळ परिसरात ज्यूसची भांडी टॉयलेटमध्ये धुताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कालच कपबश्या टॉयलेटच्या पाण्याने धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आज पुन्हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विधिमंडळ परिसरातच अन्नपुरवठा निरीक्षक लक्ष देत नसल्याचं समोर आल्याने नागपूर शहरातील खाद्यपदार्थांची काय परिस्थिती असेल याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आज अजित पवारांनी या दुकानदाराची झाडाझडती घेत स्वच्छतेची काळजी घेण्याची समज दिली. तर जागा नसल्याने शौचालयाबाहेर फळं स्वच्छ करत असलेल्यांचं ज्यूस सेंटरच्या कर्मचाऱ्यांचं मत आहे. त्याआधी आमदार अमोल मिटकरींनी बुधवारी रात्री  एक व्हिडिओ ट्विट केला. त्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटलेत. या व्हिडिओमध्ये आमदार निवासातील उपहारगृहात कपबशा स्वच्छतागृहात धुतल्या जात असल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला.