नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना, या तीन दिवसात भरगच्च कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केद्रस्तानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज विधानसभेत विरोधांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे. 


कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप यापूर्वीच विरोधकांनी केला आहे. आता आज या मुद्यावर सरकारला आणखी अडचणी आणण्याया प्रय़त्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. कर्जमाफीबरोबरच कापसावरील बोंडअळी, भातावरील तुडतुड्या यामुळे पिकाचे होणारे नुकसान याचाही मुद्दा विरोधक अधिवेशनात उपस्थित करणार आहेत. 


विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल


याबरोबरच राज्यातील अदिवासीचीं परिस्थिती, ग्रामिण भागातील आरोग्य सेवा, ओखी वादळामुळे झालेले नुकसान, समृद्धी महार्गासाठी होणारे जमीन संपादन या मुद्यावरुनही विरोधक सरकारला अडचणीत आणण्याचा प्रय़त्न करतील. यासोबतच विधान परिषदेमध्ये ओखी वादळामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतक-यांचं झालेलं नुकसान या विषयावर विरोधक आपतकालीन चर्चा उपस्थित करणार आहेत.