संघाच्या गडात भाजपला जोरदार धक्का, महाविकास आघाडीची मुसंडी
भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात महाविकासआघाडी आघाडीवर आहे
नागपूर : नागपुरात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळ लोटताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलीय. भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात महाविकासआघाडी आघाडीवर आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलीय.
नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण जागा - ५८
निकाल हाती - २२
काँग्रेस - ११
राष्ट्रवादी - ०५
भाजप - ०४
शेकाप - ०१
शिवसेना - ०
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीचे काही कल हाती आलेत. प्रामुख्याने काटोल, नरखेड, नागपूर ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहिले.