रत्नागिरीत नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज कंपनी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
येथील `नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज` कंपनीतल्या जवळपास ८० कर्मचाऱ्यांनी आज कंपनीसमोर धरणे आंदोलन केले.
रत्नागिरी : येथील 'नाईक आईस अॅण्ड कोल्ड स्टोरेज' कंपनीतल्या जवळपास ८० कर्मचाऱ्यांनी आज कंपनीसमोर धरणे आंदोलन केले.
गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्याचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यानी एकत्र येत आता कंपनीविरोधात लढा देण्याचं ठरवले आहे. व्यवस्थापकही पळून गेलेत. त्यात कर्मचाऱ्यांना कुठलीही सूचना न देता 1 जून पासून कंपनी बंद करत असल्याची नोटीस लावली आहे.
याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीचे मालक आणि पार्टनर यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. याबाबत कर्मचा-यांनी कामगार आयुक्तांकडे धाव घेतली, मात्र त्यांनाही कंपनीचे मालक प्रतिसाद देत नाहीत.. त्यामुळे कामगारांनी अखेर आज आंदोलनाचा पवित्रा घेतला.