पुणे : सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी पिंपरी चिंचवड येथे ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची प्रशंसा करत त्यांना लक्षवेधी उपमा दिली आहे. कॅन्सरसारख्या आजाराला परतवून लावणाऱ्या पवार यांनी गेल्या ५० वर्षांत राजकारणात चंद्रगुप्त तयार केला नाही. कारण, अशी बाब लक्षात येत आहे की खुद्द शरद पवार हेच चंद्रगुप्तही आहेत आणि चाणक्यही; असं वक्तव्य त्यांनी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार आपले हिरो होते, असं सांगत हा माणून कायमच महाराष्ट्रासाठी काहीतरी करेल असं वाटत असायचं. पक्ष वगैरेची इथे गोष्टच नसून आपणच एकदा पवारांना ते राजकारणातील चाणक्य असल्याचं सांगितलं होतं असं नाना म्हणाले. 


राजकारण कसं करावं हे शरद पवारांना ठाऊक असल्याची बाबही नानांनी त्यांना सांगितली होती. पण, सौबतच त्यांनी गेल्या ५० वर्षांत एकही चंद्रगुप्त तयार केला नसल्याचं खंतही त्यांनी व्यक्त केली. नानांची ही खंत फार काळ टीकू शकली नाही. कारण, शरद पवार हेच चंद्रगुप्त आणि हेच चाणक्य असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. जो माणूस कॅन्सरसारख्या आजारालाही परतवून लावतो, त्याच्यापुढे इतरांचं काय म्हणत पवारांच्या जिद्दीला नानांनी दाद दिली. 



नाना पाटेकर यांनी यावेळी सर्वसामान्य माणूस आणि दंगलीचं वातावरण यावरही भाष्य केलं. मुळात व्यक्त न होणं हाच गुन्हा असल्याचं म्हणत सामान्य जनता ऐकते, सहन करते पण त्यावर प्रश्न मात्र उपस्थित करत नाही, ही वस्तूस्थिती पाटेकर यांनी सर्वांपुढे मांडली. सहनशीलतेचा हाच उद्रेक दंगलीच्या वेळी होतो, कारण तेव्हा साचलेल्या सर्व भावना, आक्रोश यांचा भडका उडतो, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.