कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी खास कोल्हापुरी भाषेच्या लहेजात राजकीय पुढाऱ्यांना शब्दांचं कडक पायताणाने हाणलं आहे, असं वाटण्याचं कारणंही तसंच आहे, कारण नाना पाटेकर यांनी प्रतिक्रियाही तशीच दिली आहे.


नाना पाटेकर काय म्हणाले, ते जसेच्या तसे वाचा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तर माझं कायम म्हणणं असं आहे, की काही ज्यांना काही राजकीय स्थैर्य नसलेल्या जी मंडळी आहेत. ती तरूणांची माथी भडकावत्यात, आणं मग त्यानं रान पेटवायचं, त्यांची मुलं कुठे तुरूंगात जात नाहीत,  ते परदेशी शिकत्यात, अतिशय राग आहे, आत मनामध्ये, आणि त्या रागाचा उपयोग ही राजकीय मंडळी करून घेतात, त्यांच्या कोणत्याही लपेटमध्ये येऊ नका.


कारण उद्या तुरंगात तुम्ही जाणार, आठ वर्षे, दहा वर्ष, कधी कुठे पेटवून दिलं तोडलं, कुठून चुकून आनवधानानं कुणी मेला, शेवटी आपण जाणार तुरुंगात शेवटी ते आपल्या शिस्तीत आपल्या छानपैकी एसीत बसून राहणार, तेव्हा तेवढी काळजी घ्या.