राज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही, मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर नाना पाटेकर यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया.
पुणे : ‘प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” असेही नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय.
व्हिडिओ बघण्यासाठी खाली स्क्रोल करा
‘मनसेचं एक मत गेलं’
पुण्यातल्या खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या दीक्षांत संचलनाला नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. त्यानंतर बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन नाना पाटेकरांवर तुफानी शाब्दिक हल्ला चढवला होता. त्यावर बोलताना ‘राजचं काही नुकसान झालं नाही मात्र एक मत गेलं’, अशी टिप्पणी नाना पाटेकर यांनी यावेळी केली.
‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित होऊ द्या’
‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित होऊ द्या, मग योग्य अयोग्य काय ते ठरवा, अशी भूमिका अभिनेता नाना पाटेकर यांनी मांडली आहे. तसेच नाक कापण्याची भूमिका चुकीची असल्याचं ते म्हणाले.
‘नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये’
“भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता,” असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता. तर त्यावर “नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्यावर टीका केली होती.