Nana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!
Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
Nagpur Mva Vajramuth Sabha: महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे (Vajramuth Sabha) आयोजन करण्यात आले आहे. भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या नागपुरात (Nagpur News) ही महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असल्याने भाजप युवामोर्चाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा जोरदार विरोध केला. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले Nana Patole ?
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तर कॉमेटी शो सुरू आहे. अजितदादा तर जोरजोरात हसतात. नागपुरकरांना लुटण्याचं काम भाजपने केलंय. सरकारचा सर्वाधिक पैसा हा जाहीरातीवर खर्च केला जातोय. जनतेच्या घामाच्या पैशाचा दुरूपयोग केला जातोय, असं नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2 धर्मांत जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला. भाजपनं या सभेचा वाद निर्माण केला. मविआची सभा होऊ न देण्यासाठी प्रयत्न केला, असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे.
काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली. ही नागपूरमधून गेलेली स्फोटकं कुठून गेली? याला कुणी पाठवली? अजून यावर चौकशी झाली नाही, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
आमची वज्रमूठ ही विदर्भातील शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे. विदर्भवासीयांची ही वज्रमूठ राज्य सरकारला विचारते की मागच्या दहा महिन्यात तुम्ही काय दिवे लावले. काय दिलं तुम्ही विदर्भातील जनतेला. या सरकारने कोणते नवे प्रकल्प विदर्भात आणले? या सरकारने फक्त महाराष्ट्राला सूडाचं राजकारण दिलं, असा सवाल जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला.