Nana Patole on BJP : महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तर मविआच्या वज्रमुठीला घाबरल्यामुळेच नागपूरच्या सभेला भाजप विरोध करत असल्याचा पलटवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नागपुरात महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, भाजपकडून गालबोटाचा प्रयत्न होताना दिसत आहे, असे पटोले म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमधील सभा मोठी होणार, हे नक्कीच आहे. सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील त्या ठिकाणी सभा होऊ नये यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेची सगळी तयारी झालेली आहे. संजय राऊत येणार आहेत आणि जय्यत तयारी सभेची झालेली आहे. सभा विराट होणार याच शंका नाही. आधीच्या सभा पाहिल्याने भाजप घाबरले असून सभा कशी होणार नाही, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे, असे पटोले म्हणाले.


भाजप विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न


काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याबाबत काहीही हालचार झालेली नाही. ते येतील हे अद्याप स्पष्ट नाही. भाजप विरोधातील सगळे लोक एकत्र येत आहे. नितीश कुमार यांना संयोजक करण्यात आलेले आहेत. भाजप विरोधात मोट बांधण्याचा काम सुरु आहे. भाजप विरोधी राजकीय दलांचं एकत्र आणण्याचा काम काँग्रेस करत आहे. देश वाचवण्याच काम काँग्रेस करत आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.


'भाजपने हिंदुत्वाबाबत भूमिका स्पष्ट करावी'


छत्रपती शिवाजी महाराज यांचा हिंदुत्व आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. मात्र, जाणीवपूर्वक लक्ष भरकटण्याचे काम चालू आहे. महागाई वाढली. यावर सत्ता पक्षाचे लोकांनी लक्ष घातलं पाहिजे. मात्र याला तोडणे त्याला तोडण्याचे काम चालू आहे. जनतेने तुम्हाला जनतेला लुटासाठी किंवा तोडा तोडीसाठी नाही. तर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी बसवलेले आहे त्यावर चर्चा केली पाहिजे, असे ते म्हणाले.


आपण हिंदुस्थानातच राहतो. हिंदू राष्ट्राचा अर्थ भाजपने सांगावा. भाजप ज्यांना मानते त्यांचे हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती, ते त्यांनी स्पष्ट करावी. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वधर्मसमभाव मांडला आहे. भाजपने हिंदुत्व सांगून लोकांपुढे यावे. लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप सातत्याने करत आहे. आता त्यांच्याविरोधात विरोधक एकत्र येत आहे. त्यामुळे भाजप घाबरला आहे, असे पटोले म्हणाले.