नांदेड : जिल्ह्यात आदिवासी विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पाहायला मिळतोय. मुळ आदिवासींच्या विषयावरुण आदिवासी जमातींमधील दोन प्रवाह आमनेसामने आलेत.


सर्वच जमातींची चौकशी करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच नांदेड मध्ये आदिवासींनी मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर आज पुन्हा मन्नेरवारलू, महादेव कोळी आणि इतर आदिवासी जात बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बोगस आदिवासींच्या तपासणीसाठी राज्य सराकारने एसआयटी गठीत केलीये. पण चौकशी करायचीच आहे तर आदिवासीतील सर्वच जमातींची चौकशी करण्याची मागणी पुढे येतेय. 


 राज्य सरकार नवनवे नियम 


आगोदरच आदिवासी जात प्रमाणपत्रासाठी आडकाठी केली जातेय. त्यात राज्य सरकार नवनवे नियम काढत आहे. त्यामुळे आदिवासी अनेक योजनांपासुन वंचीत राहत आहेत. याचा सर्वाधीक फटका अदिवासी विद्यार्थ्यांना बसतोय. 


 शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण


जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे संतप्त आदिवासी समुदायाने नांदेड मध्ये हा मोर्चा काढला. या मोर्चात आदिवासी महिला, युवती युवकांसह 20 हजारांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते. शासनाने मागण्यांचा गांभिर्याने विचार न केल्यास या पुढे आदिवासी समाजाच्या संयमाचा उद्रेक होईल असा इशारा मोर्चाच्या निमित्ताने देण्यात आला.