अंबरनाथ : नांदेड महापालिकेत काँग्रेसने मिळवलेल्या विजयाचा आनंद अंबरनाथमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून आणि पेढे वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केला. तर दादरच्या टिळक भवनमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 


साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नांदेड महापालिकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी निर्विवाद वर्चस्व कायम राखलंय.   बहुमतासाठी आवश्यक असणारा ४२ चा आकडा काँग्रेसनं सहज ओलांडलाय. 


सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि शिवसेना दोघांचाही सुपडा पुरता साफ झालाय. या विजयाचं श्रेय़ अशोक चव्हाणांनी नांदेडच्या जनेतला दिलंय. 


दरम्यान, शहरातील विकासात्मक कामे काँग्रेसच पूर्ण करू शकते, हा लोकांना विश्वास वाटला. त्यामुळेच लोकांनी आम्हाला निवडून दिलेय. विश्वासापोटी जनेतेने आम्हाला सत्ता दिलेय. भाजपने खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मात्र, त्यांना नांदेडकरांनी मतदानातून उत्तर दिलेय, प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलेय.