नांदेड : 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या गजरात हळद आणि बेल भंडाची उधळण करत प्रसिद्ध नांदेडमधील माळेगाव यात्रेला देवस्वारीने सुरुवात झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव श्री क्षेत्र खंडोबा देवस्थाण इथं दरवर्षी माळेगाव यात्रा भरते. 


'येळकोट येळकोट'चा जयघोष 


 दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणुन ह्या यात्रेचे नावलौकीक आहे. देशभरातील व्यापारी या माळेगाव यात्रेत ५ दिवस डेरेदाखल होतात.


मानाच्या पुजेनंतर देवस्वारीने परिक्रमा पुर्ण केली. हळद आणि बेल भंडा-याची उधळण आणि येळकोट येळकोट जय मल्हारचा भाविकांनी जयघोष केला. 


२० डिसेंबरपर्यंत 


 हजारो खंडोबा भक्त देवस्वारीमध्ये सामील झाले होते. २० डिसेंबर पर्यंत ही मळेगाव यात्रा चालनार आहे.