नांदेड : नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ काँग्रेसनं फोडला आहे. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली.


नांदेडात कमळचा नारा देणा-या भाजपाचं कलम कापून काढा अशी साद चव्हाणांनी मतदारांना घातली. तर सत्तेत राहून महागाईवर आंदोलन करणा-या शिवसेनेवरही चव्हाणांनी टीका केली आहे.