नांदेड पालिका निवडणूक : आजच्या निकालाकडे लक्ष
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी काल मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच कोण बाजी मारतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
पाहा लाईव्ह निकाल, पाहण्यासाठी इथं करा क्लिक
नांदेड : महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी काल मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच कोण बाजी मारतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. काँग्रेस आपला गड राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता आहे.
पाहा महाराष्ट्र पोटनिवडणूक लाईव्ह निकाल, करा इथं क्लिक
दरम्यान, महापालिकेच्या निकालासंदर्भात काही अंदाज वर्तविले गेले आहेत. काँग्रेस आपला गड पुन्हा शाबूत ठेवण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्याचा चंग भाजपने केलेला दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये या निवडणुकीत जोरदार टक्कर आहे. कोणाला किती जागा मिळतात, भाजप चमत्कार करणार का, याकडे लक्ष आहे.
गुरुवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. दुपारी निकाल अपेक्षित आहेत. काल सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १६ टक्के तर साडेतीन वाजेपर्यंत केवळ ४५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बहुतांश मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या.
शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होणाऱ्या मतमोजणीत दुपारी २ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख यांनी सांगितले.
महापालिका निवडणूक अंदाज –ऑक्टोबर २०१७
एकूण जागा –८१
काँग्रेस – ४३ ते५३
भाजप – १७ ते २५
शिवसेना – ६ ते १२
राष्ट्रवादी – २ ते ४
एमआयएम – २ ते ३
इतर – २ ते ४