बोगस बियाणे, किटकनाशके पुरवणाऱ्या कंपन्यांवर दाखल होणार गुन्हे: रामदास कदम
जे बोगस बियाणे आणि बोगस किटकनाशके पकडण्यात आले त्या सर्वांची चौकशी करुन संबंधीत कपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना नामदार कदम यांनी नांदेड जिल्हाधिका-यांना दिल्या.
नांदेड : बोगस बियाणे आणि बोगस किटनाशके, खते पुरवणा-या कपन्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यात गतवर्षी बोगस बियाणे आणि बोगस किटकनाशके तसेच खते मोठ्या प्रमाणात आढळली होती. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा खरीप हंगाम २०१८ च्या बैठकीत कदम बोलत होते.
दोषी कंपन्यांवर गुन्हे नोंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
दरम्यान, या आगोदर शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते आणि किटकनाशके पुरवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. या प्रकरणी दोषींवर प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र, ही कारवाई करताना कपन्यांएवजी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे यापुढे हा प्रकार टाळण्यासाठी बियाणे आणि बोगस किटकनाशके आढळल्यास थेट कंपनीविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश बैठकीत नामदार कदम यांनी जिल्हाधिका-यांना दिले. सोबतच जे बोगस बियाणे आणि बोगस किटकनाशके पकडण्यात आले त्या सर्वांची चौकशी करुन संबंधीत कपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना नामदार कदम यांनी नांदेड जिल्हाधिका-यांना दिल्या.
गेल्या वर्षी बोगस बियाणांची मोठ्या प्रमाणात बोगस विक्री
खरीप हंगाम दिड महिण्यावर येऊन ठेपलाय. गतवर्षी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आणि बोगस खते, किटकनाशके विक्री करुण शेतक-यांची फसवणुक करण्यात आली आहे. त्यामुळे अश्या बोगसगिरी करनाऱ्या कपन्यांवर लगाम घालण्यासाठी आतापासुनच प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.