Sarangkheda Horse Fair | सारंगखेड्याच्या जत्रेत सव्वा कोटीचा देखणा अॅलेक्स घोडा
सारंगखेड्यात (Sarangkheda) दरवर्षी जत्रेचे आयोजन केलं जातं. घोडेबाजार हे या जत्रेचं मुख्य आकर्षण असतं.
नंदुरबार : सारंगखेड्यात (Sarangkheda) दरवर्षी जत्रेचे आयोजन केलं जातं. घोडेबाजार हे या जत्रेचं मुख्य आकर्षण असतं. या घोडेबाजाराला तब्बल 400 वर्षांचा इतिहास आहे. या घोडेबाजारात दरवर्षी किमान घोडा तरी भाव खाऊन जातोच. यंदाही असाच एक घोडा भाव खाऊन गेलाय. सध्या हा घोडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. (Nandurbar Sarangkheda horse fair alex horse)
या जत्रेत सध्या एका मारवाड प्रजातीच्या अश्वाचा बोलबाला आहे. अॅलेक्स (Alex horse) असं या घोड्याचं नाव. ब्लड लाईनवाला हा घोडा यंदाच्या जत्रेचा आकर्षण ठरलाय.
घोड्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या घोड्याची किंमत तब्बल सव्वा कोटी इतकी आहे. या देखण्या अॅलेक्सची वैशिष्ट्य आपण पाहुयात.
अॅलेक्सची चाल, त्याचा थाट, त्याचा रुबाब काही औरच. यंदाच्या सारंगखेडा अश्व मेळ्यात तो भाव खाऊन जातोय. देवली ब्लड लाईन्सचा हा महाराष्ट्रातला एकमेव अश्व आहे.
अॅलेक्सची उंची तब्बल 5 फूट 2 इंच इतकी आहे. तर वय केवळ 5. अॅलेक्सची चपळता पाहिल्यानंतर या देखण्या घोड्याची किंमत सव्वा कोटी रुपये का आहे, हे लक्षात येईल.
अब्दुल माजीद सौदागर यांच्या मालकीचा हा घोडा आहे. अब्दुल माजीद जालन्याच्या स्टड फार्मसीचे संबंधित व्यक्ती आहे. अॅलेक्सवर जीवापाड केली आहे.
देखभालीसाठी दोन माणसं
अॅलेक्सच्या दिमतीला दोन माणसं आहेत. हे दोघेही अॅलेक्सवर 24 तास लक्ष ठेवून असतात. अॅलेक्सला खास खुराक दिला जातो. अॅलेक्सचा वापर हॉर्स रायडिंग होत नाही, तो खरेदी-विक्रीसाठीही उपलब्ध नाही कारण तो ब्रीडिंग हॉर्स आहे.
केवळ प्रजननासाठी म्हणजे अश्व पैदास करण्यासाठी त्याचा वापर होतो. अॅलेक्स आतापर्यंत 5 पिल्लांचा बाप बनलाय. या पिल्लांचीच किंमत तब्बल 5 ते 15 लाखांच्या घरात आहे.
असा देखणा आणि रुबाबदार घोडा आपल्या मालकीचा असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. पण एवढा कोट्यवधींचा घोडा सांभाळायचा, म्हणजे त्यासाठी तेवढी मेहनत देखील घ्यावी लागते.