पुणे : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळयात राज्यभरातून शेकडो दिंड्या सहभागी झाल्या आहेत. आता वारकऱ्यांना ओढ माऊलीच्या भेटीची आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज पंढरपूरकडे प्रस्थान होईल. निवृत्तीनाथांच्या पादुकांचे कुशावर्त कुंडावर पूजन होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने आषाढी वारीची सुरुवात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पालखी सोहळयात राज्यभरातून शेकडो दिंड्या सहभागी होणार आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास ५० हून अधिक दिंड्यांमधून २० ते २५ हजार वारकरी निवृत्ती नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान हजर राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ज्ञानेश्वरांची माऊली आणि गुरू स्थान असलेल्या या वारीला आषाढी वारीत अनन्यसाधारण असे महत्व आहे.