Maharastra Politics: नारायण राणे (Narayan Rane) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यामुळे दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, असं समीकरण 2006 मध्ये दिसून येत होतं. मात्र, त्यावेळी राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले नाहीत. अशातच आता शिवसेना (Shiv Sena) रसातळाला गेली असताना राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्र येणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (narayan rane and raj thackeray may be come together in future maharastra politics marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळतंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) तोंडावर हे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. भांडुपमधील कोकण महोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि राणेंची शनिवारी भेट झाली. अलिकडेच राणेंनी राज ठाकरेंची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी सपत्नीक भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा एका कोकण महोत्सवाच्या निमित्तानं दोघेही एकत्र आलेत. दरम्यान, यावेळी राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार तोंडसुख देखील घेतलं.


आणखी वाचा - Devendra Fadnavis: "कधीकधी राजकारणातला एक 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो"


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी शिवतीर्थवर आलेल्या मनसैनिकांना तिळगुळ वाटत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. आज शर्मिला ठाकरेंच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. त्यानंतर घराबाहेर येत त्यांनी सर्वांना तिळगूळ देत शुभेच्छा दिल्या आणि सर्वांसोबत फोटोही काढले.


दरम्यान, शिवसेनेतील शिंदे बंडानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचं दिसून आलं होतं. तर नारायण राणे नेहमी आगखंब फुंकताना दिसतात. त्यामुळे आता राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील जवळीक वाढली की काय?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात (Maharastra Politics) विचारला जातोय. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीकोनातून राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील भेटीगाठी वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.