राणेंच्या भाजप प्रवेश चर्चेवर काय म्हणाले, चंद्रकांतदादा
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची कोकणात जोरदार चर्चा आहे. कोकण हा शिवसेनेचा नेहमीपासून बालेकिल्ला राहिलेला आहे.
कोल्हापूर : काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये आल्यास कोकणात भाजप वाढवता येईल, या समीकरणाखाली भाजपमध्ये नारायण राणे यांचा प्रवेश होण्याची चर्चा वाढली आहे.
दरम्यान, आज कोल्हापूरमध्ये भाजपचे राज्यातील महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी या विषयावर बोलताना सांगितलं, नारायण राणे जर भाजपमध्ये येत असतील? तर त्यांचं स्वागतच आहे.
मात्र मंत्रिमंडळाचा नेमका विस्तार कधी होईल किंवा नाही यावर बोलण्यास चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलणं टाळलं आहे. दरम्यान नारायण राणे यांनी भाजपमध्ये जर प्रवेश केला, तर शिवसेना आणि भाजपमधील कटुता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची कोकणात जोरदार चर्चा आहे. कोकण हा शिवसेनेचा नेहमीपासून बालेकिल्ला राहिलेला आहे.